संशयाने घेतला संसाराचा बळी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि तिचा मुलगा बापगाव भागात वास्तव्यास होते. आरोपी पती, त्यांचा मोठा मुलगा, सून आणि नातू हे दुसऱ्या ठिकाणी राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद सुरू होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपीने अनेक वेळा मारहाण ही केली होती, असा शेजाऱ्यांचा आरोप आहे.
advertisement
पुरावे नष्ट करण्याचा डाव फसला
धक्कादायक म्हणजे घटनेच्या दोन दिवस आधीच आरोपीने आपल्या मुलाला आईला ठार मारण्याची धमकी दिली होती पण कुणालाही इतक्या टोकाचं पाऊल उचलेल असं वाटलं नव्हतं.
या प्रकरणी महिलेच्या मुलाने पडघा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपीचा शोध सुरू असून तो लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे भिवंडी परिसरात शोककळा पसरली आहे.
