ठाणे : तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपल्या सीटवर बसण्यापूर्वी थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. कारण मंगला एक्स्प्रेस मध्ये साप कोकण रेल्वे मार्गावरबन मुंबईहून दिल्लीच्या दिशेने धावणाऱ्या मंगला एक्सप्रेसमध्ये आज एक थरकाप उडविणारी घटना घडली आहे. धावत्या ट्रेनमध्ये अचानक साप आल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
advertisement
व्यक्तीचं सापावर लक्ष जाताच तो साप साप ओरडू लागला होता. साप असं नाव ऐकलं तरी अंगावर काटा येतो. तसेच व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी वाट मिळेल तिकडे पळू लागतात. मात्र यावेळी साप ट्रेनमध्ये होता. ट्रेनमध्ये धावण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच धांदळ उडाली होती. मंगला एक्स्प्रेसमध्ये साप असल्याची माहिती मिळताच मंगला एक्स्प्रेस कसारा स्थानकावर थांबवण्यात आली होती. याची माहिती कसारा रेल्वे स्टेशन मास्तर ला देण्यात आली तसेच पोलिस आरपीएफ मिळताच सर्पमित्रा ला कसारा स्थानकावर बोलावून या सापाला रेस्क्यू करण्यात आले
कसाराला एक्सप्रेस थांबवली
मुंबईहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेस च्या डब्बा नंबर S/7 च्या कपलिंग मध्ये साप आडकला असल्याची माहिती कसारा रेल्वे स्टेशन मास्तरला देण्यात आली. माहिती मिळताच कसारा रेल्वे पोलीस व आर पी एफ घटनास्थळी दाखल झाले. सर्पमित्राला का सरळ रेल्वे स्थानकावर ती बोलवून मंगला एक्सप्रेसच्या कपलिंगमध्ये अडकलेल्या हरीण टोल नावाच्या सापाला रेस्क्यू करून जंगलात सोडणार असल्याची माहिती दिली या नंतर मंगला एक्सप्रेस ही दिल्लीच्या दिशेने रवाना झाली आहे.
प्रवाशांना मोठा दिलासा
साप बाहेर काढल्यावर रेल्वे पोलिसांनी संपूर्ण कोचची शहानिशा केल्याने येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. तसेच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडत आपल्या ठिकाणी प्रवास केला. साप थेट ट्रेनमध्ये शिरलाच कसा असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. उपस्थित प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
