ठाणे-भिवंडी अंतर होणार चुटकीसरशी पार
सध्या ठाणे ते भिवंडी प्रवास करण्यासाठी साधारण 45 मिनिटांचा वेळ लागतो. कारण वाहनांना बाळकुम नाका आणि कशेळी पुलातून वळसा घालून जावे लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो आणि तिथे सतत वाहतूक कोंडीही होते. मात्र, आता एमएमआरडीए वसई खाडीवर सहा पदरी पूल उभारणार आहेत,ज्यामुळे ठाण्यातील कोलशेत आणि भिवंडीतील काल्हेर ही दोन महत्त्वाची ठिकाणं थेट जोडली जातील.
advertisement
नेमकं किती मिनिटांत होणार आतंर पार?
नव्या पुलामुळे हा 45 मिनिटांचा प्रवास आता फक्त 5 ते 7 मिनिटांत पूर्ण होईल. वसई खाडीवर उभारला जाणारा हा पूल साधारण 2.2 किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी तब्बल 430 कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. या पुलासाठी गुरुवारी निविदा काढण्यात आल्या असून तीन वर्षांत बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित सांगितले गेले आहे.
इतकेच नव्हे तर भिवंडीमध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानकही होणार असल्याने या भागाचे महत्त्व आणखी वाढणार आहे. उद्योग आणि लॉजिस्टिकच्या दृष्टीने भिवंडी हा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जात आहे, त्यामुळे नवीन पूल हा ठाणे आणि भिवंडी या दोन्ही शहरांच्या विकासासाठी मोठा टप्पा ठरणार आहे.
