TRENDING:

Thane Metro : ठाणेकरांनो तयार राहा! शहरात वर्तुळाकार मेट्रो होणार सुरू; कसा असेल रुट?

Last Updated:

Thane Metro Update : ठाणेकरांना आता नव्या मेट्रोतून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. मात्र ही मेट्रो मार्गिका कशी असेल कोणत्या भागांना जोडणारी असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
thane metro
thane metro
advertisement

ठाणे : मुंबईसह अनेक उपनगरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी मेट्रोचे जाळे वेगाने निर्माण होत आहे. ज्यात ठाणे शहरात मेट्रोचे अनेक प्रकल्प वेगाने बनत असताना त्यात ठाणे अंतर्गत एक नवा मेट्रो प्रकल्प राबवला जाणार आहे. हा प्रकल्प कसा असेल किती ठिकाणांना जोडणारा असेल त्याबाबत जाणून घ्या.

advertisement

जाणून घ्या सविस्तर

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पासाठी महामेट्रोने 223.70 कोटी रुपयांची निविदा जाहीर केली आहे. या निविदेअंतर्गत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजय नगरी, वाघबीळ आणि वॉटरफ्रंट येथे उन्नत मेट्रो स्थानकांचे बांधकाम करण्यात येणार आहे.

advertisement

ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोची एकूण लांबी 29 किलोमीटर असून या मार्गावर 22 स्थानके असतील. पहिल्या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीच्या मार्गावर 6 स्थानकांचे काम पूर्ण केले जाणार आहे. संपूर्ण मार्गिकेपैकी सुमारे 26 किलोमीटर मार्ग उन्नत स्वरूपाचा असेल. ठाणे रेल्वे स्थानकाच्या जवळील दोन मेट्रो स्थानके मात्र भूमिगत असणार आहेत.

advertisement

कोणत्या भागात प्रवास करणं होणार सोयीस्कर?

या मेट्रो प्रकल्पामुळे ठाण्यातील वागळे इस्टेट, घोडबंदर, कोलशेत, साकेत यांसारख्या महत्त्वाच्या अंतर्गत भागांना थेट मेट्रो जोड मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सोपा, जलद आणि सुरक्षित होणार आहे.

ठाणे मेट्रोचा मुंबई मेट्रो 4 आणि मेट्रो 5 मार्गिकांशी थेट संपर्क राहणार असल्याने ठाणे ते मुंबई तसेच ठाणे ते कल्याण असा मेट्रो प्रवास शक्य होईल. यामुळे उपनगरांमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 2045 पर्यंत या मेट्रोतून दररोज सुमारे 8 लाख 70 हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त भागीदारीतून उभारला जाणारा हा प्रकल्प सुमारे 12 हजार 200 कोटी रुपयांचा आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
115 वर्षांची परंपरा, पुण्यातील प्रसिद्ध पाणीपुरी, जपलीये तिचं चव, Video
सर्व पहा

मराठी बातम्या/ठाणे/
Thane Metro : ठाणेकरांनो तयार राहा! शहरात वर्तुळाकार मेट्रो होणार सुरू; कसा असेल रुट?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल