उन्हाचा पारा चढला तरी काळजी नको
शहरात उष्णतेचा वाढता परिणाम लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. ज्यामध्ये उन्हाळ्यात सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनचालकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये हिरवी जाळी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उन्हाळ्यात दुपारच्या वेळी सिग्नलवर वाहनचालकांना काही वेळ उभे राहावे लागते. यामुळे त्यांना थेट उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रमुख सिग्नलवर हिरवी जाळी उभारणार आहे. यामुळे वाहनचालकांना काही प्रमाणात सावली मिळणार असून उष्णतेपासून दिलासा मिळेल.
advertisement
नागरिकांसाठी गर्दीच्या ठिकाणी पाणपोईची सोय
याशिवाय नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शहरातील 25 गर्दीच्या ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई सुरू करण्याची तयारी महापालिकेकडून करण्यात आली आहे. बाजारपेठा, बसस्थानके आणि इतर वर्दळीच्या ठिकाणी या पाणपोई उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची सोय होणार आहे.
