अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत ठाणे महापालिकेच्या महापौरांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. महापौर पिंपळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना त्यांची पगारातील थकबाकी देणी फेडण्याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांची पगारातली थकबाकी 30 मार्च 2026 पर्यंत कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा केला जाणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तीन हप्त्यांचे एकत्रित वाटप टीएमटी कर्मचाऱ्यांना केले जाणार आहे.
advertisement
कार्यरत अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यातच हे पैसे येणार आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांना कोणतेही कागदपत्र जमा करावे लागणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे सुरुवातीला 12%- 15%ची पगारवाढ झाली असली तरी, सहा वर्षांतील पगारातील तफावत पाच टप्प्यांत वितरित करण्याचे नियोजन आहे. यापूर्वी दोन हप्ते अदा करण्यात आले असून, सध्याच्या घोषणेद्वारे प्रलंबित असलेल्या रकमेबाबतच्या वाढत्या असंतोषावर तोडगा काढण्यात आला आहे. दरम्यान, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव आणि इतर वरिष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाचा उद्देश कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवणे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे.
