TRENDING:

ठाण्यात राजकीय संकट! निवडणुकीआधीच उमेदवारांची रिसॉर्टवारी, कोणत्या पक्षाने कोणत्या हॉटेलमध्ये ठोकलाय मुक्काम?

Last Updated:

⁠अपक्ष उमेदवारांना निवडून येण्याआधीच सोन्यापेक्षा जास्त भाव मिळाला आहे. त्यामुळे दोन्ही नगरपरिषदेत मोठ्या घोडेबाजाराला सुरुवात झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : सर्वाधिक महापालिका असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केले असून त्याची सुरुवात कल्याण-डोंबिवलीपासून केली आहे. भाजपच्या या ऑपरेशन लोटसमध्ये कल्याण लोकसभेचे खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भाजपने पूर्णतः एकाकी घेरले आहे. भाजपच्या या ऑपरेशन लोटसची दिल्ली दरबारी देखील तक्रर झाली आहे. दरम्यान अंबरनाथ, बदलापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे.
AMBARNATH NAGARPALIKA
AMBARNATH NAGARPALIKA
advertisement

ठाणे जिल्ह्यातील ऑपरेशन लोटसमुळे नगर परिषदेच्या निवडणुकांनी सर्व पक्षांचे टेन्शन वाढवलंय. या निवडणुकीत आपला विजय व्हावा, यासाठी पक्षांनी कंबर कसलीय. एकमेकांना चेकमेट देण्यासाठी सर्व पक्षांकडून साम,दामची रणनीती आखली जातेय, यासाठीनिवडणुकांअगोदरच हॉटेल वारी सुरू झाली आहे. अंबरनाथ बदलापूर नगरपरीषदेत अर्ज मागे घेण्याची उद्याची शेवटची तारीख आहे.यावेळी कोणता दगाफटका होऊ नये यासाठी सर्वाच पक्ष काळजी घेत असून अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदचे सर्वच उमेदवारांचा मुक्काम अज्ञात स्थळी हलवण्यात आला आहे.

advertisement

⁠भाजप, शिवसेने उबाठा आणि इतर पक्षांच्या उमेदवारांना अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याची माहिती आहे. ⁠अंबरनाथमध्ये पाच भाजपाच्या आणि एका शिवसेनेच्या उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने अपक्ष उमेदवारांचा घोडेबाजार वाढला आहे. ⁠अपक्ष उमेदवारांना निवडून येण्याआधीच सोन्यापेक्षा जास्त भाव मिळाला आहे. त्यामुळे दोन्ही नगरपरिषदेत मोठ्या घोडेबाजाराला सुरुवात झाली आहे.

अंबरनाथमध्ये अपक्षांशिवाय पर्याय नाही

advertisement

अर्ज माघार घेण्याच्या आदल्या दिवशी सर्व पक्षांनी काळजी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. काहींनी उमेदवारांना रिसॅार्ट तर काहींना मुख्य कार्यालय येथे हलवण्यात आलंय सत्ता स्थापन करण्याकरता अंबरनाथमध्ये अपक्षांशिवाय पर्याय नाही. ⁠यामुळे निवडून येण्याआधीच अपक्षांचे सर्व लाड पुरवले जात आहेत.

अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, उमेदवारांची पळवापळवी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात झपाट्याने बदल, मका आणि कांद्याची काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

अंबरनाथ निवडणुकीत राजकीय उलथापालथ झाली असून उद्या अर्ज मागे घ्यायचा शेवट दिवस असल्याने उमेदवार पळवा पळविला आता सुरुवात होईल, अशी देखील चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. भाजप आणि शिवसेनेची 30 वर्षाची युती या निवडणुकीत तुटली आहे. अंबरनाथ नगरपालिका स्वबळावर लढत असल्याने येथील लढत चुरशीची होणार असून याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आजच भाजपला मोठा धक्का बसला आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षानी नगराध्यक्षपदाकरिता आपले उमेदवार उभे केले असून आज उमेदवारी अर्ज भरलेही आहेत.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
ठाण्यात राजकीय संकट! निवडणुकीआधीच उमेदवारांची रिसॉर्टवारी, कोणत्या पक्षाने कोणत्या हॉटेलमध्ये ठोकलाय मुक्काम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल