मात्र हे सुंदर स्वप्न पूर्ण होण्याआधीच काळाने घाला घातला. ज्या घरात आनंदाचे क्षण साठवायचे होते तिथेच दुर्दैवाने मृत्यूने दार ठोठावले. ठाण्यात घडलेली ही घटना मन सुन्न करणारी आहे. घरातील कर्ता पुरुष तो क्षणात कायमचा निघून गेला. हे दृश्य पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.
नेमकं काय घडलं?
ठाण्यातील लोकमान्यनगरमध्ये हा प्रसंग घडलेला असून मनोज मोरे या (वय45) वर्षीय व्यक्तीचा यात मृत्यू झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकमान्यनगर परिसरातील करुमेदेव सोसायटीत मनोज मोरे हे आपल्या कुटुंबियांसोबत भाड्याने राहत होते. जी इमारत साधारण 16 वर्षे जुनी आहे. शनिवारी पहाटे घरातील हॉलमध्ये झोपले असताना अचानक प्लास्टरसह स्लॅबचा मोठा भाग कोसळला. त्या वेळी चार जण झोपेत होते. पत्नी अर्पिता मोरे यांच्या डोक्याला दुखापत झाली तर 16 वर्षीय आरुष मोरेच्या दोन्ही पायांना मार बसला. मात्र सर्वाधिक गंभीर दुखापत मनोज मोरे यांच्या छातीला झाली.
advertisement
जखमी अवस्थेत त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अन् काही सेकंदांतच कुटुंबाचा आधार हिरावून घेतला गेला. यातील भावनिक गोष्ट म्हणजे मनोज मोरे येथे भाड्याने राहण्याचे कारण हे होती की, त्यांचे भांडुपमधील स्वत:च्या घराचे पुनर्विकास काम सुरू होते. पण काही दिवसांसाठी येथं येणे त्यांना आयुष्यभरासाठी दुखात टाकले आहे.
या घटनेनंतर महापालिकेचे उपायुक्त दिनेश तायडे यांनी घटनास्थळी पाहणी करून इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले. मात्र प्रश्न असा आहे की एखाद्या निष्पापाचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे का होते? ठाण्यात आजही हजारो नागरिक अशाच धोकादायक आणि जीर्ण इमारतींमध्ये जीव मुठीत धरून राहत आहेत. पुढचा बळी कोण, हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात घर करून बसला आहे.
