एसटी महामंडळाची मोठी घोषणा
एसटी महामंडळ दरवर्षी उन्हाळी सुट्टी, दिवाळी आणि इतर सणांच्या काळात प्रवाशांसाठी विविध योजना राबवत असते. आता पुन्हा एकदा नाताळच्या सुट्टीत लालपरीप्रवाशांना देवदर्शन घडवणार आहे. या पॅकेज टूरमध्ये प्रवासाचा खर्च समाविष्ट असून राहणे आणि जेवणाचा खर्च प्रवाशांना स्वतः करावा लागणार आहे. तिकीट दरात शासनाच्या नियमानुसार सर्व सवलती लागू राहणार आहेत.
advertisement
'कल्पना तुमची, नियोजन आमचे' या उपक्रमांतर्गत ग्रुप बुकिंगची सुविधाही देण्यात आली आहे. महिला बचतगट, संस्था किंवा कुटुंबीयांसाठी थेट त्यांच्या ठिकाणाहून बस उपलब्ध करून दिली जाणार आहे.
ठाण्यातून थेट बस कधी सुटणार ते पाहा
ठाणे आगार क्रमांक 1 येथून अष्टविनायक दर्शनाची सहल आयोजित करण्यात आली आहे. ही बस 27 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता ठाणे खोपट आगारातून सुटणार असून पाली येथे रात्री मुक्काम असेल. 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता परतीचा प्रवास सुरू होऊन रात्री ठाण्यात आगमन होणार आहे. यासाठी तिकीट दर 1,323 रुपये प्रति व्यक्ती असून हाफ तिकीट 664 रुपये आहे.
तसेच ठाणे आगार क्रमांक 2 येथून पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूर देवदर्शनाची सहल 25 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता निघणार आहे. परतीचा प्रवास 27 डिसेंबरला असेल यासाठी तिकीट दर 2,036 रुपये प्रति व्यक्ती आणि अर्थ तिकीट 1,021 रुपये आहे.
