ठाणे : नोव्हेंबरमध्ये गुलाबी थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या ठाणेकरांना घामाच्या धारा पुसाव्या लागत आहे. ठाणे शहराचा कमाल पारा 35 अंश सेल्सिअस ओलांडत असून सलग वाढणाऱ्या उष्णतेमुळे ठाणेकर हैराण झाले आहेत. गेल्या आठवड्यात 30 अंशांवर असलेले तापमान काहीच दिवसांत झपाट्याने वाढत 35 अंशांपर्यंत गेले आहे. पहाटे किंचित गारवा आणि दुपारच्या वेळी प्रखर उन्हाचा तडाखा या विसंगत हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. जमिनीतील ओलावा
advertisement
तापमान नोंद
दिनांक. कमाल. किमान
21 नोव्हेंबर. 33.20. 21.60
22 नोव्हेंबर. 34.20 22.70
23 नोव्हेंबर. 34.70 23.60
24 नोव्हेंबर. 34.80 23.70
कोरडे वारे आणि सूर्याची तीव्रता वाढल्याने उकाड्यात भर पडत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. येत्या 48 ते 72 तासांत तापमान वाढीची शक्यता आहे. या वातावरणा बदलाचा आरोग्यावरही या उकाड्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
