मुलं शाळेच्या बाहेर चणे विकताना त्यांना व्यवसायाची आवड निर्माण झाली, म्हणून मोकळ्या वेळेत कचऱ्यात पडलेल्या बॅग आणि कपडे घरी आणायचे त्यांना धुवून व्यवस्थित करून खोलायचे चैन तुटली असेल तर लावायचे वगैरे आणि सायन स्टेशनवर नेऊन ते विकायचे. 1980 पासून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. परंतु मेहनतीने 15रु. मिळत असतील तर उपयोग नाही. म्हणून त्याच परिस्थितीत ते स्वतःच शिकले वेगवेगळ्या बॅग बनवायला. कुठे क्लास लावायला पैशाची कमतरता म्हणून पुढे पाऊल टाकायला मागे पर्याय शिल्लक नव्हता.
advertisement
त्यामुळे लोकरे यांनी वयाच्या 8 वर्षापासून चणे विकण्यापासून आज चांगले कारागीर होईपर्यंत पर्यंत कष्ट केले. लोकरे यांची एकवेळ अशी होती की राहायला घर नाही म्हणून वडिलांनी जंगलात राहून दिवस काढले तर जालंदर यांनी काम करायचे तिथेच राहायचं असे दिवस काढले. आज ही परिस्थिती बदलत त्यांनी मुंबई सारख्या शहरात स्वतःच घर आणि मुलांचं शिक्षण हे सर्व शून्यातून उभ केलं यांनी परिस्थिती माणसानं शिकवते. आई वडिलांचे एकुलेत एक लोकरे आज सोबत फक्त कला आणि त्या कलेच्या जोरावर त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले.
आज 45 ते 50 वर्षांत कल्याणमध्ये लोकरे बॅगवाले म्हणून त्याची ओळख आहे. आपण काढलेले दिवस पुढच्या पिढीला नको म्हणून केलेल्या कष्ट मेहनत ते शिकले नाही पण मुलांना शिकवलं. त्यांना राहायला घर नव्हतं पण मुलांना आज घर दिलं. आज ते वयाच्या साठीमध्ये सुधारक जल्लोषात बॅग बनवण्याचा काम करत आहेत. आज त्याच स्वतःच बॅग च दुकान आहे. एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला मागे टाकणाऱ्या जालंदर लोकरेंचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.