वसई रोड स्थानकावरी प्रवाशांचा प्रवास होणार सुखकारक
वसई रोड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आणि 7 वर नवीन एलिवेटेड डेक प्रवाशांसाठी सुरू करण्यात आले आहे. हा डेक मुंबई रेल्वे विकास महामंडळाने बांधला असून त्याची लांबी 60 मीटर आणि रुंदी 10 मीटर आहे. नवीन डेकमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित,सोपा आणि आरामदायक होईल.
advertisement
दररोज हजारो प्रवासी वसई रोड स्थानकावरून ये-जा करतात, त्यामुळे गर्दी खूप वाढते. या नवीन डेकमुळे प्लॅटफॉर्मवर होणारी ताण कमी होईल आणि प्रवाशांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्यावर जाणे अधिक सोपे होईल. डेकवर 3 मीटर रुंदीच्या जिन्यांची सोय आहे, ज्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांची हालचाल सुरळीत होईल.
याशिवाय हा डेक गर्दी व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर नेहमीच्या तुलनेत कमी वेळेत पोहचता येईल, त्यामुळे उशिरा येणाऱ्या किंवा धावपळीने प्रवास करणाऱ्या लोकांना खूप मदत होईल. स्थानकाची सुरक्षितता वाढेल आणि सर्व प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर होईल.
