ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड नंबर 30 मधून AIMIM ची तरूण हिजाबवाली ही नगरसेविका म्हणून निवडून आली आहे. सहर शेख असे या नवनिर्वाचित नगरसेविकेचे नाव आहे. सहर शेखच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तरुण सहर शेख यांनी थेट जितेंद्र आव्हाडांना डिवचलं आहे. सहर शेखचे वडील युनुस शेख आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद सर्वश्रृत आहेत. लेकीच्या विजयानंतल यूनुस शेथ म्हणाले की, अल्लाहने 'हिजाबवाल्या' लेकीला देशात फेमल केले आहे. बाप- लेकीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
advertisement
संपूर्ण मुंब्रा हिरवा रंगवायचायं : सहर शेख
सहर शेख म्हणाल्या, आम्हाला कोणाच्या वरदहस्ताची गरज नाही.आम्ही त्यांच्या अहंकाराला मातीमोल केलं आहे, ज्यांना असं वाटत होतं की आम्ही त्यांच्यावर अवलंबून आहोत, ते हे विसरले की आम्ही फक्त
आणि फक्त 'अल्ला'चे मोहताज आहोत. आम्ही कोणाच्या बापाच्या मेहेरबानीवर अवलंबून नाही. पाच वर्षांनंतर जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा तुम्हाला त्यांना यापेक्षाही मोठे आणि सडेतोड प्रत्युत्तर द्यायचे आहे. संपूर्ण मुंब्रा अशा हिरव्या रंगात रंगवायचा आहे की, या लोकांना येथून दारुण पराभव पत्करूनच परत जावे लागेल...
कोण आहेत सहर शेख? (Who is Sahar Shaikh?)
- सहर शेखचे वडील युनूस शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे लेकीसाठी तिकिट मागितले होते.
- मात्र तिकिट नाकारल्यानंतर सहर यांनी AIMIM पक्षाकडून निवडणूक लढवली.
- सहर शेख सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.
- सहर शेख यांचे इन्स्टाग्रामवर 3 लाख 40 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
लेकीच्या दणदणीत विजयानंतर सहर शेखचे वडील युनूस शेख यांनी थेट जितेंद्र आव्हाडांना इशारा दिला आहे, आत्ताच वॉर्निंग देतोय इथून पुढे कोणाच्याही लेकीच्या भविष्यासोबत खेळू नका... नाही तर आमची जनता एकत्र होऊन कशी विकेट पाडते पाहिलं ना... हिंदू असो किंवा मुस्लिम किंवा कोणत्याही धर्मची असो मुलगी ही मुलगी असते.
हे ही वाचा :
