शिंदेसेनेचा दिल्लीत मोठा डाव, मुंबईच्या 'त्या' 30 मुस्लिम जागांची केली तक्रार; हायकमांडकडे वाचला पाढा
- Published by:Prachi Amale
Last Updated:
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भाजपची तक्रार थेट केंद्रीय नेतृत्वाकडे गेली असून मुंबईत भाजपामुळे शिवसेनेचं सर्वात जास्त नुकसान झाल्याचा दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी
नवी दिल्ली: राज्यामध्ये नुकत्याच महापालिका निवडणूका पार पडल्या असून मुंबईत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. राज्यामध्ये भाजप पक्ष हा मोठा ठरला आहे. त्यामुळे आता महापालिकेपासून केंद्रापर्यंत भाजपचे अधिराज्य असल्याचे दिसून आले आहे. मुंबई महापालिकेवर देखील महायुतीचा झेंडा फडकला आहे. मात्र शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांचे निवडून आलेले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता थेट दिल्ली दरबारी गेला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भाजपची तक्रार थेट केंद्रीय नेतृत्वाकडे गेली असून मुंबईत भाजपामुळे शिवसेनेचं सर्वात जास्त नुकसान झाल्याचा दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महायुतीमध्ये अंतर्गत कलह निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर महायुतीमध्ये विजयाचा जल्लोष साजरा होत असला तरी पडद्यामागे मात्र मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबईत भाजपामुळे शिवसेनेचं सर्वात जास्त नुकसान झाले असून मुस्लिम मतदार असलेल्या जागा शिवसेनेला दिल्या आहेत. एवढच नाही तर 15 जागांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोधात काम केल्याचाही आरोप शिवसेनेने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
नेमकी शिवसेनेने काय तक्रार केली?
भाजपामुळे शिवसेनेचे मुंबईत सर्वात जास्त नुकसान झाल आहे. जवळपास 30 मुस्लिम जागा घेण्यास भाजपने नकार दिला होता. भाजपला मुस्लिम मतदान करणार नाही यामुळे या जागा शिवसेनेल दिल्या. सोबतच 15 जागांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले विरोधात काम केले. तसेच शिवसेना उमेदवारांच्या विरोधात 3 ठिकाणी भाजपने उमेदवार दिल्याची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
भाजपने देखील केली तक्रार
एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर मोठा डाव खेळला आहे. मुंबई महापालिकेवर ठाकरेंची सत्ता तब्बल 25 वर्षानंतर गेली आहे. त्यामुळे मुंबई पालिकेवर शिवसेनेचे नाही तर भाजपचा महापौर बसेल असे स्पष्ट झाले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांचे नगरसेवक हे निकाल लागल्यापासून हॉटेलमध्ये ठेवले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा लढल्याने युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाला अशी भावना भाजप नेत्यांची झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजप जास्त जागा लढली असती तर भाजपने 100 हून जास्त जागा जिंकल्या असत्या असं मत भाजप नेत्यांनी व्यक्त केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. यासंबंधीची भूमिका केंद्रीय नेतृत्वाकडे भाजपच्या राज्यातील नेत्यांनी मांडली असल्याची माहिती आहे. तसंच शिंदे यांच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही केंद्रीय नेतृत्वासमोर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 5:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिंदेसेनेचा दिल्लीत मोठा डाव, मुंबईच्या 'त्या' 30 मुस्लिम जागांची केली तक्रार; हायकमांडकडे वाचला पाढा







