तब्बल 30 वर्षांनंतर शनि आणि सूर्य एकत्र, 'या' 3 राशींच्या नशिबात राजयोग; बँक बॅलन्समध्ये होणार मोठी वाढ!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात शनी आणि सूर्य या दोन्ही ग्रहांच्या युतीला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. शनी हा कर्माचा कारक आहे, तर सूर्य हा सत्ता आणि तेजाचा प्रतीक आहे.
advertisement
advertisement
मेष - सन्मान आणि धनवृद्धी: मेष राशीच्या जातकांसाठी ही युती अत्यंत फलदायी ठरणार आहे. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. विशेषतः सरकारी क्षेत्राशी संबंधित कामे यशस्वी होतील. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जर तुम्ही राजकारणात किंवा सामाजिक क्षेत्रात असाल, तर तुम्हाला मोठे पद मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा परतावा मिळू शकतो.
advertisement
मिथुन - करिअरमध्ये नवी उंची: मिथुन राशीच्या लोकांसाठी ही युती भाग्योदयाची ठरेल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. परदेश प्रवासाचे योग जुळून येतील. जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात, त्यांच्यासाठी हा काळ विस्ताराचा आहे. वडिलांकडून तुम्हाला आर्थिक किंवा मानसिक सहकार्य लाभेल, जे प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरेल.
advertisement
कुंभ - कष्टाचे फळ मिळणार: शनी आणि सूर्याच्या या संयोगामुळे तुमच्या राशीत आत्मविश्वास वाढेल. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली तुमची कामे आता पूर्ण होतील. शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला शिस्त लागेल, तर सूर्याच्या तेजामुळे तुम्ही लोकांवर प्रभाव टाकू शकाल. आर्थिक चणचण दूर होईल आणि नवीन घर किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. बेरोजगारांना हवी तशी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे.







