TRENDING:

देवेंद्र फडणवीस बहुमतांनी जिंकून येतील; अमृता फडणवीसांचा विश्वास

अमृता फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली त्या वेळेस देवेंद्र फडणवीस पुन्हा बहुमतांनी जिंकून येतील असा विश्वास अमृता फडणवीसांनी व्यक्त केला तसेच देवेंद्र फडणवीसांना त्यांनी शुभेछ्या देखील दिल्या.

Last Updated: Oct 26, 2024, 11:50 IST
Advertisement

'आगी'ची गुलाल! जेजुरी गडावर भंडाऱ्याचा स्फोट, NCP चे कार्यकर्त भाजले LIVE VIDEO

जेजुरी गडावर एक धक्कादायक घटना घडली आहे. नगरपरिषदेत विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई यांनी जेजुरी गड गाठला. भंडारा उधळत असताना अचानक स्फोट झाला. जेजुरी गडाच्या कमानीजवळ हा प्रकार घडला. या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक गंभीररीत्या भाजले असून जवळपास 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Last Updated: Dec 21, 2025, 21:42 IST

अंबरनाथमध्ये बोगस मतदानासाठी लोकं आणल्याचा काँग्रेसचा आरोप,VIDEO

ठाणे

राज्यात नगरपरिषदा निवडणुकीचे मतदान जोरदार सुरु होते.अंबरनाथमधील कोहोजगावातल्या सभागृहात लोकांनी पहाटे गर्दी केली होती.कारण तिथे बोगस महिला व पुरुष एका बंधिस्त सभागृहात एकत्र थांबले होते.काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रतिस्पर्धी पक्षावर बोगस महिला व पुरुष मतदार आणल्याचा आरोप केला आहे.काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुक अधिकाऱ्यांना चौकशी करायला लावली. संबंधित अधिकाऱ्यांनी जर हे बोगस मतदार असती तर संबंधितांवर पोलिस योग्य ती कारवाई करतील असे सांगितले आहे.

Last Updated: Dec 20, 2025, 23:37 IST
Advertisement

भाजप आमदारांकडून रिक्षाचालकाला मारहाण..,VIDEO

घाटकोपर येथे भाजप आमदार पराग शहा यांनी रिक्षाचालकाच्या कानशिलात लावले.सोबतच त्या रिक्षाचालकाला शिवीगाळ केली होती. असे गैरवर्तन केल्याने पराग शहा यांनी कायदा हातात घेऊ नये असे सामान्य नागरिक म्हणत आहेत.त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला.

Last Updated: Dec 20, 2025, 21:38 IST

गडहिंग्लजमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ,VIDEO

\r\nगडहिंग्लजचे मतदान शेवटच्या टप्प्यावर आले होते. तेव्हा तेथील प्रभाग क्र 3 च्या मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाला. महिला मागास प्रवर्गासाठीच्या उमेदवारासाठी हे मतदान होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार) गटाच्या विरोधात इतर सर्व पक्ष एकत्र आले होते. उमेदवार प्रतिनीधी केंद्रात आत जाण्यावरुन हा गोंधळ झाला होता.परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करत या गोंधळाला नियंत्रणात आणले.

Last Updated: Dec 20, 2025, 22:13 IST
Advertisement

अमरावतीच्या नांदगाव पेठमध्ये तरुणाची हत्या,VIDEO

अमरावतीतील नांदगाव पेठमध्ये जुन्या वादावरुन एका तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेत 20 ते 25 गुंडांनी दहशत करत 7 ते 8 दुचाकी आणि कारच्या तोडफोड केल्या. इतर लोकांनाही त्यानी जखमी केले. त्यामुळे तेथील लोकं या दहशतीच्या वातावरणाला खूपच घाबरले होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले.\r\n

Last Updated: Dec 20, 2025, 22:05 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/Maharashtra Assembly Elections/
देवेंद्र फडणवीस बहुमतांनी जिंकून येतील; अमृता फडणवीसांचा विश्वास
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल