TRENDING:

IPL मधून बाहेर झाले 12 बॉलर... मुंबई इंडियन्सनाही धक्का, प्लेइंग इलेव्हन डिस्टर्ब होणार!

Last Updated:
आयपीएल 2026 च्या मोसमाला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे, पण आयपीएल सुरू व्हायच्या आधीच तब्बल 8 बॉलरना दुखापत झाली आहे.
advertisement
1/9
IPL मधून बाहेर झाले 12 बॉलर... मुंबई इंडियन्सनाही धक्का, प्लेइंग इलेव्हन डिस्टर्ब होणार!
आयपीएलच्या 19व्या हंगामातला पहिलाच सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे, पण पहिल्या सामन्याआधीच स्पर्धेला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे.
advertisement
2/9
आयपीएलमधून आतापर्यंत 12 बॉलर बाहेर झाले आहेत, ज्यात ऑस्ट्रेलियाच्या 5, श्रीलंकेच्या 3 बॉलर्सचा समावेश आहे. तर एक न्यूझीलंडचा, एक इंग्लंडचा, दोन भारतीय बॉलर आहेत.
advertisement
3/9
पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क जॉश हेजलवूड, नॅथन एलिस, झॅक एडवर्ड्स या चार ऑस्ट्रेलियाच्या 5 फास्ट बॉलरना दुखापत झाली आहे. तर श्रीलंकेच्या पथिराणा, हसरंगा आणि मलिंगाही दुखापतग्रस्त आहेत.
advertisement
4/9
न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन, इंग्लंडचा सॅम करन आणि भारताच्या हर्षित राणा, अथर्व अंकोलेकरचाही या यादीत समावेश आहे.
advertisement
5/9
सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स आणि आरसीबीचा फास्ट बॉलर जॉश हेजलवूड सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळणार नाहीत. तर पंजाब किंग्सचा फास्ट बॉलर लॉकी फर्ग्युसन याला मुलगा झाल्यामुळे तो सुरूवातीच्या काही सामन्यांसाठी उपलब्ध नसेल.
advertisement
6/9
हर्षित राणा, झॅक एडवर्ड्स आणि नॅथन एलिस हे आयपीएलच्या संपूर्ण मोसमातून बाहेर झाले आहेत. हर्षित राणा हा केकेआरकडे आहे, तर सॅम करनला चेन्नईने राजस्थानकडे ट्रेड केलं आहे. नॅथन एलिस हा सीएसकेकडे होता.
advertisement
7/9
मिचेल स्टार्क दिल्लीकडे, वानिंदू हसरंगा लखनऊकडे, इशान मलिंगा हैदराबादकडे आहेत. या खेळाडूंच्या आयपीएल खेळण्याबाबत अजूनही सस्पेन्स आहे, पण दुखापतीमुळे हे खेळाडू सुरूवातीच्या सामन्यांना मुकणार आहेत.
advertisement
8/9
25 वर्षांच्या झॅक एडवर्ड्सला हैदराबादने विकत घेतलं होतं, पण दुखापतीमुळे तो संपूर्ण मोसमात खेळू शकणार नाही. केकेआरचा आणखी एक फास्ट बॉलर मथिशा पथिराणाही दुखापतीमुळे सुरूवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार नाही.
advertisement
9/9
मुंबई इंडियन्सने लिलावात विकत घेतलेला डावखुरा स्पिन बॉलर अथर्व अंकोलेकरही संपूर्ण मोसमातून बाहेर झाला आहे. मुंबईने अंकोलेकरला 30 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. रणजी ट्रॉफीच्या सामन्यात फिल्डिंग करत असताना अथर्वला दुखापत झाली, यानंतर त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL मधून बाहेर झाले 12 बॉलर... मुंबई इंडियन्सनाही धक्का, प्लेइंग इलेव्हन डिस्टर्ब होणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल