बुलढाणा : निसर्गाच्या सानिध्यातच देवाचे स्थान असते असे म्हणतात. आजही महाराष्ट्रातल्या बहुतांश देवाचे स्थान असलेल्या ठिकाणांना नयनरम्य निसर्गाचे सान्निध्य लाभले आहे. काही देवस्थाने तिथल्या निसर्गामुळे प्रसिद्ध आहेत. बरेच भाविक देवदर्शना सोबत निसर्गाची हवा खाण्यास महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणच्या देवस्थानाला भेट देत असतात.महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर आहे. या सरोवरामध्ये अनेकांची प्राचीन मंदिर आहे त्यापैकीच एक मंदिर म्हणजे कमळाच्या माता देवीचे मंदिर आहे.