
छत्रपती संभाजीनगर : आजकाल वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे डायट करतात. यामध्ये कोणी सोशल मीडियावरती बघून, कोणी नुसतं वॉटर फास्टिंग करतं तर कोणी सेलिब्रिटीचे डायट फॉलो करतात. त्यासोबत कोणी दिवसातून फक्त एकदा जेवणाचा डायट फॉलो करतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे डायट अनेकजण वजन कमी करण्यासाठी फॉलो करत असतात. पण हे जे सर्व डायट आहेत, याला फॅड डायट म्हणतात. म्हणजेच की या डायटमध्ये कितपत सत्य असते किंवा याचा फायदा होतो की होत नाही, याविषयी माहिती आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी सांगितलेली आहे.