समृद्धी महामार्गावर खिळे असल्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकारामुळे समृद्धीवरून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. पण, जेव्हा या प्रकाराची चौकशी करण्यात आली तेव्हा वेगळीच माहिती समोर आली. प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, हे खिळे नसून महामार्गावर दुरुस्तीसाठी नोजल्स मारण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यातला हा प्रकार होता. तुर्तास हे नोजल्स हटवण्यात आले असून घाबरण्याचं कारण नाही