
खोपोलीतील नवनिर्वाचीत नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या करण्यात आली. या मंगेश काळोखे हत्ये प्रकरणात 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रंवींद्र देवकर आणि दर्शन देवकर अशी आरोपी व्यक्तींची नावं आहेत. तसेच एफआयआरमध्ये म्हटले आहे की, कोयता, तलवार, कुऱ्हाडने वार करत मंगेश यांची हत्या केली गेली .तसेच निवडणुकीतील पराभव, राजकीय वाद, पुर्व वैमनस्य या कारणाने ही हत्या करण्यात आली आहे. असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.
Last Updated: Dec 27, 2025, 14:39 ISTठाणे: दिवाळीनंतर राज्यात थंडीचा जोर वाढत आहे. या काळात आरोग्यदायी आहार घेणं गरजेचं असतं. अनेकजण या काळात विविध प्रकारचे सूप पिण्याला प्राधान्य देतात. यात टोमॅटो सूपला विशेष पसंती असते. हिवाळ्यातील थंड वातावरणात टोमॅटो सूप आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. आपणही आपल्यात अगदी 10 मिनिंटात आरोग्यदायी टोमॅटो सूप बनवू शकता. याचीच रेसिपी ठाण्यातील गृहिणी छाया शिंदे यांनी सांगितली आहे.
Last Updated: Dec 27, 2025, 16:28 ISTबारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथील एका हॉटेल चालकाला गावगुंडांनी बेदम मारहाण केली आहे. हॉटेल चालकाने त्या इसमाला हप्ता न दिल्याने ही मारहाण करण्यात आली आहे. जर हॉटेल चालवायचं असेल तर हफ्ता द्यावा लागेल अशी धमकी या इसमाने हॉटेल चालकाला दिली. संबंधीत व्यक्तीची शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
Last Updated: Dec 27, 2025, 16:22 ISTराज्यात महापालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्यातचं आता छ.सभाजीनगमध्ये MIM च्या उमेदवारीवरुन दोन गटात तुफान राडा झाला आहे. प्रभाग क्र.12 मध्ये माजी नगरसेवक हाजी इसाक यांना उमेदवारी डावलून मोहम्मद असराक यांना MIM कडून उमेदवारी देण्यात आली. तेव्हा त्यांनी रॅली काढली होती. या रॅली दरम्यान हाजी इसाक समर्थकांनी मोहम्मद असराक यांच्यावर हल्ला केला.
Last Updated: Dec 27, 2025, 16:05 ISTमुंबईमध्ये महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. अनेक पक्षांचे कार्यकर्ते आपल्या पक्षाचा प्रचार करत आहेत. त्यातच आता या निवडणुकीबद्दल मुंबईकरांचं नेमकं मत काय आहे ? मुबईकर नेमकं कोणाला मत देणार ? हा प्रश्न पडतो. याची उत्तरं सामान्य नागरिकांनी दिली आहेत.
Last Updated: Dec 27, 2025, 15:45 ISTछत्रपती संभाजीनगर : हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. हिवाळा म्हटलं की सगळीकडे छान थंडगार असं वातावरण असतं. पण अशातच लहान मुलांचा आहार देखील चांगला असणं गरजेचं आहे. तर या हिवाळ्यामध्ये आपल्या लहान मुलांचा आहार कसा असावा? त्यांच्या आहारामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश असावा? याविषयी आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती सांगितलेली आहे.
Last Updated: Dec 27, 2025, 15:36 IST