
कल्याण : चिंबोरी थंडीत खाणे महत्त्वाचे मानले जाते कारण शरीराला उष्णता आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात चिंबोरीमधून मिळत असतो. त्यामुळे बहुतांश लोक उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात चिंबोरी खाणे टाळतात परंतु हिवाळ्यात आवर्जून याचे सेवन केले जाते. आज आपण आगरी पद्धतीतले झणझणीत मसालेदार चिंबोरी रस्सा कसा बनवायचा बघणार आहोत. जे भाकरी किंवा भातासोबत अप्रतिम लागते.
Last Updated: Jan 09, 2026, 17:31 ISTउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपालिकेतील गेल्या महिनाभरापासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. येथील घडामोडींची चर्चा राज्यात नाही तर दिल्लीत देखील झाली. अंबरनाथमध्ये भाजपने एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी थेट काँग्रेसशी युती केली . ही विचित्र युती देशभरात चर्चेचा विषय ठरली. यानंतर काँग्रेसनं त्यांच्या 12 नगरसेवकांचं निलंबन केलं. या नगरसेवकांना भाजपनं आपल्या पक्षात घेतलं. सत्ता स्थापनेचा दावा केला. पण आता श्रीकांत शिंदेंनी मोठी राजकीय खेळी करत भाजपला धक्का दिला आहे.
Last Updated: Jan 09, 2026, 19:34 ISTबीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे. एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे. यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे.विरोधकांनी शिंदे गटाला घेरताना आता कुठं हिंदुत्व असा सवाल केला आहे. शिवसेना शिंदे गटाने एमआयएमसोबत केलेली युती ही राज्यात चर्चेची विषय ठरली आहे. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Last Updated: Jan 09, 2026, 19:25 ISTपिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार आणि भाडपचे महेश लांडगे यांच्या शाब्दिक युद्ध चालू होते. त्यात आता रोहित पवारांनी उडी घेतली आहे. ते म्हणाले की, " महेश लांडगे हे महिलांचा अपमान करत आहेत.बांगड्या घातल्या की कर्तृत्ववान पुरुष नसतो असं जर लांडगेंच मत असेल तर त्यांचा खरा चेहरा निवडणुकी अगोदर समोर येत आहे."
Last Updated: Jan 09, 2026, 19:00 ISTसोलापूर : सोलापूर शहरातील संगमेश्वर कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने घरगुती गॅस आणि कॉपर पाईपचा वापर करत गरम पाण्याचा हीटर बनवला आहे. आदिती पाटील असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. हा हीटर बनवण्यासाठी आदितीला 500 रुपयांपर्यंत खर्च आला आहे. ही संकल्पना कशी सुचली या संदर्भात अधिक माहिती विद्यार्थिनी आदिती पाटील यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
Last Updated: Jan 09, 2026, 18:52 ISTमूड महापालिकांचं या शो मधून नवी मुंबईच्या जनतेचा कौल नेमका कोणाला? याचा आढावा घेतला आहे. यामध्ये वेगवेदगळ्या पक्षांवर टीका केली आहे. त्यात नवी मुंबईचा रोड मॅप काय आहे? यावर भाष्य केलं आहे. विकासाच्या मुद्द्यांवर राजकीय वाद दिसले आहेत.
Last Updated: Jan 09, 2026, 18:15 IST