TRENDING:

गरमागरम तुरीची कचोरी अन् तळलेली मिरची! हिवाळ्यात घरीच करा बेस्ट नाश्ता

Food

अमरावती : सध्या मार्केटमध्ये ओले तुरीचे दाणे उपलब्ध आहेत. त्यापासून विविध पदार्थ तयार होतात. त्यातीलच एक म्हणजे तुरीच्या दाण्याची कचोरी. ही कचोरी बनवायला थोडी किचकट पण खायला अतिशय टेस्टी लागते. काही टिप्स फॉलो केल्यास ही कचोरी अतिशय खुसखुशीत तयार होते. जाणून घेऊ रेसिपी.

Last Updated: Dec 26, 2025, 13:30 IST
Advertisement

संजय राऊतांचा भाजपवर घणाघात, "भाजप गुंडांचं...",VIDEO

शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला आहे. ते म्हणाले, " महाड नगरपालिका निवडणुकीत भाजपने काँग्रेस कार्यकर्त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.हा किती गंभीर गुन्हा आहे.मंत्र्यांचा मुलगा गायब आहे.पोलीस ही खाकी वर्दीतली भाजपची टोळी आहे.मंत्र्यांची मुलं,भाऊ कसे सुटतात.हे देवेंद्र भडणवीसांना माहिती आहे.भाजप हा गुंडांचं राज्य चालवतं."असा प्रहार भाजपवर त्यांनी केला.

Last Updated: Dec 26, 2025, 17:16 IST

तरुणाच्या हत्येनं नागपूर हादरलं,वादाचं कारण अस्पष्ट VIDEO

नागपूरच्या वर्धा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. नागपूरमध्ये काल नाताळनिमित्त अनेक पब आणि बार चालू ठेवण्यात आले होते. त्यातील डाबो पबमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. तेव्हा पबमध्ये दोन युवकांच्या टोळीत वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, त्या वादानंतर एका मुलावर 4-5 जणांनी हल्ला केला आणि त्या मुलाची हत्या झाली. ही घटना प्राईड हॉटेल परिसरातील आहे.सोनेगाव पोलीसात या घटनेचा गुन्हा दाखल केला गेला. पण वादाचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. हत्या झालेल्या मुलाचे नाव प्रणय नारनव असं आहे.

Last Updated: Dec 26, 2025, 16:47 IST
Advertisement

शौचाच्या वेळी रक्त येतंय किंवा खाज येतेय? सावधान! 'ही' असू शकतात मूळव्याधाची लक्षणे

नाशिक : पाइल्स हा एक सर्वसामान्य आजार आहे, जो कोणालाही होऊ शकतो. याला वैद्यकीय भाषेत मूळव्याध असेही म्हणतात. मूळव्याध म्हणजे गुदद्वाराजवळ असलेला कोंब. मूळव्याध हे दोन प्रकारचे असतात. पहिला आतील मूळव्याध जो गुदाशयाच्या आतमध्ये विकसित होतो आणि दुसरा बाहेरील मूळव्याध जो बाहेर म्हणजे गुदाशयाच्या भोवतीच्या त्वचेखाली विकसित होतो.

Last Updated: Dec 26, 2025, 16:39 IST

जयसिंगपुर पोलीस ठाण्यासमोर दोन गटात तुफान हाणामारी,VIDEO

कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापुरातील जयसिंगपुर पोलीस ठाण्यासमोरच दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे. गावातील वाद घेवून दोन गट पोलीस ठाण्यात आले होते. पण ते आमनेसामने आल्यावर त्यांच्यात हाणामारी झाली.हाणामारीत एकमेकांना उचलून आपटलं.दोन्ही गटातील लोकं जखमी झाली आहेत.दोनही गट खूपच आक्रमक झाले होते. पोलीसांनी मध्यस्थी करत ही हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी या दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले आहेत.या वादाचे कारण अस्पष्ट आहे.

Last Updated: Dec 26, 2025, 16:22 IST
Advertisement

डोळ्यांना होतोय मधुमेहाचा त्रास, रुग्णांनी काळजी कशी घ्यावी? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

पुणे : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारत हा मधुमेहाची जागतिक राजधानी बनलेला आहे. मधुमेह हा एक गंभीर आजार आहे आणि मधुमेह असणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेहाचा शरीरावर अनेक वेगवेगळे दुष्परिणाम हे होत असतात. मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे डोळ्यावर दुष्परिणाम होऊन कायम स्वरूपी अंधत्व येऊ शकते. त्यामुळे डोळ्यांना मधुमेहाचा त्रास होत असेल तर रुग्णांनी काळजी कशी घ्यावी? याविषयी नेत्र तज्ज्ञ संतोष भिडे माहिती यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: Dec 26, 2025, 16:15 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
गरमागरम तुरीची कचोरी अन् तळलेली मिरची! हिवाळ्यात घरीच करा बेस्ट नाश्ता
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल