मुंबई: रोज सकाळी नाश्त्याला पोहे आणि उप्पीट खाण्याचा अनेकांना कंटाळा येतो. दिवसभराची ऊर्जा याच सकाळच्या नाश्त्यातूनच मिळते. त्यामुळे झटपट आणि पौष्टिक नाश्त्याच्या शोधात असलेल्या गृहिणींसाठी एक उत्तम पर्याय आहे. आता ज्वारीच्या पिठाचे चवदार आणि हेल्दी आप्पे अवघ्या काही मिनिटांत तयार करता येणार आहेत. मुंबईतील गृहिणी वैशाली कांबळे यांनी ही सोपी रेसिपी सांगितली आहे.