TRENDING:

मटण-चिकन विसराल अशी झणझणीत 'सुरण कंदाची' भाजी! आरोग्यासाठी खूपच फायदेशीर, पाहा रेसिपी VIDEO

Food

अमरावती : हिवाळ्यामध्ये अनेकांना वात ही समस्या उद्भवते. त्यामुळे अमरावतीमधील काही भागांत हिवाळ्यात सुरण कंदाचे सेवन केले जाते. सुरण कंद हा दोन प्रकारचा असतो एक गावरान आणि दुसरा जंगली. जंगली सुरण कंद हा खाण्यासाठी वापरत नाहीत. त्याचा उपयोग फक्त औषधी म्हणून केला जातो. गावरान सुरण कंद हा हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी वापरतात. प्रत्येक भागांत याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. अमरावती स्पेशल सुरण कंदाची भाजी कशी बनवतात? याबद्दल गृहिणी सुनिता घुलक्षे यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: Dec 27, 2025, 17:30 IST
Advertisement

झणझणीत वांग्याच भरीत! खान्देशी खास रेसिपी पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी; पाहा सविस्तर व्हिडिओ

Food

जळगाव : जळगाव हे सोन्याच्या शुद्धतेसाठी तर जिल्हा कापूस आणि केळीच्या भांडारासाठी प्रसिद्ध आहे. खान्देशचा भाग असलेल्या जळगावकरांच्या जिभेचे चोचले पुरविणाऱ्या काही पदार्थांची चव लयभारी असते. त्यापैकीच जळगावातील अस्सल मेनूची सुरुवात होते ती भरताच्या वांग्यापासून. खान्देशात भरीतासोबत पारंपरिक खाद्य म्हणजे कळण्याची भाकरी खाल्ली जाते. बऱ्याच वेळा हिवाळ्यात भरीत पार्ट्या रंगतात तेव्हा कळण्याची भाकर आणि कोशिंबीर असा बेत असतो. विशेषतः पाहुणे मंडळी आल्यावर त्यांना भरीताचा आस्वाद आवर्जून देतात. याच भरीताची रेसिपी कशी करायची याबद्दल आपल्याला गृहिणी जागृती चौधरी यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: Dec 27, 2025, 19:19 IST

आदित्य ठाकरे पोहोचले 'तपोवन'मध्ये, पर्यावरण प्रेमी तरुणांसोबत काय बोलले? VIDEO

कुंभमेळ्यासाठी नाशिक मधील तपोवन परिसरात साधूग्राम उभारण्याची घोषणा झाली. त्यासाठी 1800 झाडे तोडणार आहेत. याकारणास्तव पर्यावरणवाद्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यातच आता शिवसेना (उबाठा) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नाशिक येथील तपोवनाला भेट दिली आहे.तेव्हा ते म्हणाले, "आमचा कुंभमेळ्याला विरोध नाही.तपोवनातील झाडं कापण्याला आमचा विरोध कायम असेल,"

Last Updated: Dec 27, 2025, 19:17 IST
Advertisement

गँगस्टर बंडू आंदेकरने भरला उमेदवारी अर्ज, मीडियाला पाहून केलं असं काही, VIDEO

पुणे

पुण्यात महापालिकेच्या निवडणुकीसाठी गँगस्टर बंडू आंदेकरनं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तो आयुष खोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याला पुण्यातील विशेष उच्च न्यायालयाने निवडणुक लढवण्यासाठी परवानगी दिली आहे.त्याने अर्ज भरल्यानंतर 'नेकी का काम, आंदेकर का नाम' अशी घोषणा त्याने केली.

Last Updated: Dec 27, 2025, 19:05 IST

आरोग्यदायी आणि टेस्टी 'नाचणीच्या पिठाचं सूप'... कडाक्याच्या थंडीत चाखून पाहाच; Video

थंडीच्या दिवसांमध्ये उत्तम आरोग्यासाठी आहारही आरोग्यदायी असणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण आपल्या घरीच आरोग्यदायी पदार्थ बनवू शकतो. यात नाचणीच्या पिठापासून मंचाव सूप हा एक उत्तम पर्याय आहे. आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असणारं हे सूप कसं बनवायचं? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा तल्हार यांनी माहिती दिलीये.

Last Updated: Dec 27, 2025, 18:00 IST
Advertisement

BMC election: मुंबईत मच्छिमारांचा कौल कुणाला? भांडूपकरांच्या मनात काय?

मुंबई पालिकेच्या निवडणुकीत कोण जिंकणार ? त्यामुळे मुंबईच्या मतदारांचे मत नेमकं कोणाला? हा प्रश्न सर्वच मराठी माणसाला पडला आहे. न्यूज18 लोकमतच्या 'बघतोय रिक्षावाला' या नव्या शो मधून भांडूपच्या जनतेचा कल नेमका कोणाकडे आहे याची चाचपणी केली आहे.भांडुपच्या मच्छी मार्केटच्या सामान्य महिलांनी आणि इतर सामान्य नागरिकांनी कोण निवडूण येणार यावर आपआपली मतं मांडली आहेत.

Last Updated: Dec 27, 2025, 17:36 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
मटण-चिकन विसराल अशी झणझणीत 'सुरण कंदाची' भाजी! आरोग्यासाठी खूपच फायदेशीर, पाहा रेसिपी VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल