
ठाकुर्ली : सध्या अनेक जण वेगवेगळ्या पदवी घेऊन खासगी नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. बऱ्याच वेळा संसाराच्या गाड्यात स्वप्न अपुरी राहतात. पण एमबीए फायनान्स झालेल्या विवाहित महिलेनं संसारातून वेळ काढून स्वत: ची ओळख निर्माण केली आहे. ममता उतेकर असं हा हॉटेल व्यवसाय करणाऱ्या महिलेचं नाव आहे.
Last Updated: Jan 07, 2026, 13:43 ISTठाण्यातील राबोडी परिसरात काल राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आमने सामने आले होते. त्यामुळे तिकडे तणावाचे वातावरण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला या परिसरात गेले होते. त्यांना पाहून नजीब मुल्ला समर्थकांनी घोषणाबाजी केली. आमदार जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न मुल्ला यांच्या कार्यकर्त्यांनी केला.
Last Updated: Jan 08, 2026, 16:33 ISTरिक्षावाल्याच्या नजरेतून ठाणेकर या पालिका निवडणूकीकडे नेमका कसा पाहतोय ते आज 'बघतोय रिक्षावाला' या खास शो मधून दाखवलं आहे. ठाणेकर नेमकं काय म्हणत आहेत? ते या शो मधून मांडलं आहे.
Last Updated: Jan 08, 2026, 16:19 ISTमहेश मांजरेकर आणि खासदार संजय राऊत यांची ठाकरे बंधूंची मुलाखत घेतली. तेव्हा राज ठाकरे मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले, आज संकट महाराष्ट्रावर आहे, मुंबईवर आहे. हे संकट मराठी माणसाला समजलं आहे.काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरु आहे हे ही माहिती आहे.एकच गोष्ट आम्ही एकत्र यायचं कारण नाही, आमच्याच अस्तित्वाची नाही तर मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. बाहेरुन येणाऱ्यांची दादागिरी वाढत आहे.
Last Updated: Jan 08, 2026, 15:55 ISTअंबरनाथमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण 12 नगरसेवकांनी भाजप प्रवेश केला आहे. त्यांचा हा प्रवेश नवी मुंबईमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पाडला.
Last Updated: Jan 08, 2026, 15:40 ISTकोल्हापुरात एक प्रचारात एक वेगळा रंग पाहायला मिळाला. आम आदमी पार्टीचे शाहिर दिलीप सावंत आपल्या लेकीसोबत निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यांनी आपली मुलगी दिप्ती जाधव यांच्यासोबत डफ तुंतुण वाजवत प्रचार केला आहे.त्यांनी या शाहिरी मधून समस्या आणि सामाजिक प्रश्न मांडले आहेत. आम आदमी पार्टीमधून दिप्ती जाधव उभ्या राहिल्या आहेत.
Last Updated: Jan 08, 2026, 15:30 IST