महेश तिवारी प्रतिनिधी, गडचिरोली : महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पूरपात्रात वाढ होत असून मेडिगड्डा धरणातून सात लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी गोदावरी नदीचा पात्र एक किलोमीटर रुंदीचं असून या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर गोदावरीचा प्रवास या ठिकाणी कसा आहे मेडिगड्डा धरणाची सध्याची अवस्था काय आहे पाहा VIDEO.