पुणे : आयुष्यात प्रगती करायची असेल तर सर्वात महत्त्वाचा असतो 'आत्मविश्वास'. स्वत:वर विश्वास असेल तर व्यक्ती अवघडातले अवघड अग्नीदिव्य पार करू शकते. परंतु हा आत्मविश्वास लहानपणीच निर्माण होणं आवश्यक असतं. तो निर्माण करण्याचं काम शिक्षक करतातच, परंतु पालकांनीही त्यासाठी प्रयत्न करायलाच हवे.