मुंबई : पूर्वीच्या काळात नवजात बाळाच्या आहारात आईच्या दुधाला सर्वोच्च महत्त्व दिले जात असे. पारंपरिक पद्धतीने आईचे दूध बाळाला देण्यावर भर असे. मात्र, सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि बाजारात उपलब्ध असलेल्या प्रक्रिया केलेल्या दुधामुळे, बाळाच्या पोषणाच्या पद्धतीत मोठा बदल झालेला दिसतो. प्रवास करताना किंवा बाहेर असताना अनेक मातांना फॉर्म्युला फीडिंगवर अवलंबून राहावे लागते