बीड : हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गारवा वाढतो आणि हवामान बदलतं, त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, दमा अशा आजारांचा धोका अधिक वाढतो. या काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि लहान मुले तसेच वयोवृद्ध व्यक्ती पटकन आजारी पडतात. त्यामुळे या ऋतूत संतुलित आणि पौष्टिक आहार घेणं आवश्यक असल्याचं डॉक्टर सांगतात. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. विलास राठोड यांनी सांगितलं की योग्य आहार घेतल्यास हिवाळ्यातील संसर्गजन्य आजारांपासून मोठ्या प्रमाणात बचाव करता येतो.