
कोल्हापूर : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बरेचजण सकाळी गडबडीने घरातून कामाला जायला बाहेर पडतात. अशावेळी कित्येकदा नाश्ता करणे राहून जाते. पण अशा परिस्थितीत खाण्या पिण्याची अयोग्य सवय आणि व्यस्त जीवनशैली याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होवू शकतो, असे आहारतज्ज्ञ सांगतात. कोल्हापूरच्या आहारतज्ज्ञ अमृता सूर्यवंशी यांनी सकाळी नाश्ता करण्याबद्दल माहिती दिली आहे.