
कोकणातील दाभोळखाडी येथील मच्छिमार बांधवांना जीवन जगण्याचा आधार म्हणजे ही खाडी आहे. तीच खाडी आता प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे दाभोळखाडीतील मच्छिमार कुटुंब अडचणीत आले आहेत. हजारो पारंपारिक मच्छिमार मोटाकुटीला आहेत. एमआयडीसी परिसरातून रसायनमिश्रित सांडपाणी सोडल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे.