TRENDING:

दारूसाठी पैसे दिले नाहीत, त्याचं डोकं फिरलं, घराला आग लावली अन् पत्नीसोबत मोठं कांड

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: मारहाणीनंतरही आरोपीचा राग शांत न होता त्याने अधिक धोकादायक कृत्य केल्याचा आरोप आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे घरगुती हिंसाचाराची गंभीर आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीवर अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. केवळ मारहाणीतच न थांबता आरोपीने घर जाळण्याचा प्रयत्न केला तसेच शेतातील मका पिकालाही आग लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Chhatrapati Sambhajinagar: दारूसाठी पैसे दिले नाहीत, त्याचं डोकं फिरलं, घर अन् मका पिकाला आग लावली अन् पत्नीला...
Chhatrapati Sambhajinagar: दारूसाठी पैसे दिले नाहीत, त्याचं डोकं फिरलं, घर अन् मका पिकाला आग लावली अन् पत्नीला...
advertisement

या प्रकरणी पिंपळगाव पेठ, गणेशवाडी शिवारात राहणाऱ्या पार्वताबाई सुदाम दुधे (वय 38, व्यवसाय शेती) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती सुदाम शामराव दुधे याच्याविरोधात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे.

4 वर्षांची चिमुकली, अंगावर 50 जखमा, 11 दिवसांनी नवे कपडे घातले अन्..., छ. संभाजीनगरात काय घडलं?

advertisement

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 10 मार्च रोजी रात्री सुमारे आठ वाजताच्या सुमारास शेत गट क्रमांक 109 मध्ये घडली. आरोपी पतीने पत्नीला दारूसाठी पैसे मागितले होते. मात्र तिने पैसे देण्यास नकार दिल्याने तो चिडला. संतापाच्या भरात त्याने पत्नीला शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. या मारहाणीत महिलेला दुखापत झाली असून तिने आपला जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कन्यादानाला तयार, पण अन्नदानाचं काय? इराण युद्धामुळं पुण्यातली लग्नं रद्द होण्याची वेळ, काय घडतंय? Video
सर्व पहा

मारहाणीनंतरही आरोपीचा राग शांत न होता त्याने अधिक धोकादायक कृत्य केल्याचा आरोप आहे. राहत्या घरात झोपण्यासाठी ठेवलेल्या कपड्यांना आग लावून घर पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय शेतातील उभ्या मका पिकालाही आग लावण्यात आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे घरगुती हिंसाचाराबरोबरच मालमत्तेच्या नुकसानीचा मुद्दा ऐरणीवर आला असून पोलिसांकडून सर्व बाबींचा सखोल तपास केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
दारूसाठी पैसे दिले नाहीत, त्याचं डोकं फिरलं, घराला आग लावली अन् पत्नीसोबत मोठं कांड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल