TRENDING:

एकनाथ शिंदे जयचंद, तर भाजपच्या १०० पिढ्यांची हिंमतच... संजय राऊतांनी सगळंच काढलं, VIDEO

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, "बहुतेक सर्व नगरसेवक शिंदेंकडे गेले नसते. आमच्याकडून फोडले गेलेले सगळे पराभूत झाले. एकनाथ शिंदे जैचंद झाला नसता तर भाजपच्या १०० पिढ्या उतरल्या असत्या तरी भाजपचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता."

Last Updated: Jan 17, 2026, 14:52 IST
Advertisement

तृतीयपंथीयांसाठी पूजा ठरल्या आशेचा किरण, एका क्लिकवर सुटणार आता प्रश्न,आणला खास APP

पुणे

पुणे: पिंपरी-चिंचवड येथील पूजा कदम तृतीयपंथीयांच्या आयुष्यातील आशेचा किरण ठरत आहेत. तृतीयपंथी व्यक्तींना स्वावलंबी, सुरक्षित आणि सन्मानाने जीवन जगता यावे, तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने पूजा कदम किरण ॲप विकसित करत आहेत. नुकत्याच चंद्रपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत किरण ॲपने राज्यातील पहिल्या दहामध्ये स्थान पटकावले आहे. ही स्पर्धा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती, आणि पुणे विभागातून कदम यांची राज्यस्तरावर निवड झाली आहे.

Last Updated: Jan 17, 2026, 15:40 IST

संभाजीनगरात भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या घरावर दगडफेक, ४ जणांवर गुन्हा दाखल , VIDEO

संभाजीनगरमध्ये भाजपचे पराभूत उमेदवार बंटी चावरीया यांच्या घरावर लाठ्याकाट्या आणि दगडफेक केली आहे. शहरात गांधीनगरमध्ये मध्यरात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated: Jan 17, 2026, 15:31 IST
Advertisement

'सतत चिडचिड अन झोप येत नाही?'शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी करतोय मानसिक ताण;उपाय काय ? Video

बीड

बीड : आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत ताणतणाव हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. कामाचा वाढता ताण, आर्थिक चिंता, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक अपेक्षा आणि सतत बदलणारी जीवनशैली यामुळे मानसिक ताण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अनेक जण ताणतणावाकडे किरकोळ समस्या म्हणून पाहतात, मात्र तो दीर्घकाळ राहिल्यास शरीर आणि मनावर गंभीर परिणाम घडवू शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

Last Updated: Jan 17, 2026, 15:23 IST

शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव, पोराने थेट त्याच्या भावाची कार पेटवली, पिंपरीतली घटना VIDEO

पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकाचा निकाल लागला आणि थेरगाव मध्ये एक कार पेटवली आहे. ही गाडी शिंदे शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या चुलत भावाची आहे. त्यानंतर त्यांनी ही गाडी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही कार पेटवली आहे. हा सीसीटीव्ही व्हायरल झाला.

Last Updated: Jan 17, 2026, 15:10 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
एकनाथ शिंदे जयचंद, तर भाजपच्या १०० पिढ्यांची हिंमतच... संजय राऊतांनी सगळंच काढलं, VIDEO
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल