
कोकणातील शिमगा सण हा मोठ्या दामधुमीत साजरा केला जातो. अनेक परंपरा असतात. संकासुराची एन्ट्री आणि हवा - शिमगा सुरू झाला की सगळ्यात आधी चर्चा होते ती संकासुराची. काळाकुट्ट रंग, अंगावर फाटकी तुटकी कपडे, तोंडावर एक विशिष्ट मुखवटा आणि हातात काठी, अशा रूपात संकासूर घरोघरी फिरतो. ढोल-ताशांच्या तालावर संकासूर जो नाच करतो, त्याला एक वेगळीच लय असते.रत्नागिरीतील कोळथरे गावात शिमगोत्सवाची सेम अशीच धूम पाहायला मिळत आहे. गोमुचे खेळ, संकासुर पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली.