
अपघाताबाबत एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर येत आहे. रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या संशयाप्रमाणेच, ज्या पद्धतीने हे विमान कोसळले आणि त्यापूर्वीच्या काही घडामोडी पाहता, हा पूर्वनियोजित कट तर नव्हता ना? अशी शंका पवार कुटुंबीयांच्या मनात निर्माण झाली आहे.आता अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि संपूर्ण कुटुंब या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे खात्रीने सूत्रांकडून समजते.