
एक मराठी तरुणी डोंबिवली स्टेशन परिसरात गेल्या काही काळापासून हातगाडीवर शॉरमा विक्रीचा व्यवसाय करत आहे. मात्र, केडीएमसी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार केवळ तिच्याच स्टॉलवर कारवाई केली जात असल्याचा दावा तिने केला आहे. इतर अनेक हातगाड्या आणि फेरीवाले व्यवसाय करत असताना, आपल्यालाच लक्ष्य केले जात असल्याचा आरोप तिने सोशल मीडियावरून केला. विशेष म्हणजे, काही फेरीवाल्यांना पालिका अधिकारी अप्रत्यक्षपणे पाठीशी घालत असल्याचाही दावा तिने आपल्या पोस्टमध्ये केला.