बारामतीत प्रचारावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील फुटीसंदर्भात मोठं विधान केलंय. अजित पवार म्हणाले की, तुम्हाला वाटत असेल की अजित पवारांनी साहेबांना सोडायला नको होतं. पण मी साहेबांना सोडलेलं नाही. साहेबांना सांगितलं होतं सगळ्यांचं मत होतं की सरकारमध्ये जावं. कामांना स्थगिती आली होती. तापच झाला होता, लोक वेड्यात काढतील. पैसे दिलेत पण पुन्हा स्टे दिला. स्टे पण उठला पाहिजे. वेळ जाऊन चालत नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला होता.