
बीडच्या परळीतील न्यू हायस्कुलमध्ये दहावीच्या पेपरला कॉपी पुरवण्यासाठी जीवघेणी कसरत केल्याची घटना समोर आली आहे. इंग्रजीच्या पेपरवेळी काही हुल्लडबाज तरुण कॉपी पुरवताना भिंतीवर चढले होते. त्यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.कॉपी फेकून कसे पळत आहेत हे तरुण ते सगळं सीसीटीव्हीत कैद झाले आहे. चक्क कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडला आहे.