
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी, बारामती: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर बारामतीतील त्यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट सुरू आहे. बारामतीच्या गोविंद बाग येथून शरद पवार हे अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटी या निवासस्थानी दाखल झाले आहे. सहयोग निवासस्थानी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, रोहित पवार हे सहयोग सोसायटी येथे दाखल झाले आहेत.