मुंबई: पावसाळ्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अळूची पाने बाजारात मोठ्या प्रमाणावर दिसू लागतात. त्याच वेळी पारंपरिक पाककृतींची आठवण होते आणि त्या यादीत सर्वात वर असते आलूवडी. अळूच्या पानांतून तयार होणारी ही पारंपरिक वडी आता नव्या पिढीलाही खूपच आवडू लागली आहे. घरच्या घरी सहज तयार करता येणारी ही वडी पौष्टिक, चविष्ट आणि कुरकुरीत असते. पाहुयात अळूवडी घरीच सोप्या पद्धतीने कशी बनवायची.