पुणे: विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येतात. मात्र, बाहेरगावाहून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. घरभाडं आणि जेवणाचा खर्च भागवणं कठीण जातं. त्यामुळे अनेक विद्यार्थी दिवसातून फक्त एक वेळचं जेवण करून भूक भागवतात. कधी वडापाव, तर कधी स्वस्तात मिळेल त्या पदार्थावर भूक भागवावी लागते.अशाच विद्यार्थ्यांची पोटाची आग ओळखली धाराशिवहून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका तरुणाने. सध्या तो 500 हून अधिक विद्यार्थ्यांना दोन वेळचं जेवण विनामूल्य पुरवत आहे.