पुणे: तुमच्या मनात स्वप्नांप्रती जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटी असेल, तर काहीही अशक्य नाही. हेच सिद्ध करून दाखवले आहे राजश्री गागरे यांनी. मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील असलेल्या आणि सध्या पुण्यात स्थायिक झालेल्या राजश्री गागरे यांनी शेतकरी महिला ते जर्मन कंपनीची मालकीण होण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे, ही कंपनी आशिया खंडातील पहिली चुंबक बनवणारी कंपनी आहे. राजश्री गागरे यांचा प्रवास एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा आहे. या संपूर्ण प्रवासाबद्दल त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.