TRENDING:

Weather alert: महाराष्ट्रात पाऊस आणखी धुमाकूळ घालणार, 29 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याचं हवामान विभागाच्या अंदाजावरून स्पष्ट होतंय. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्रात पाऊस आणखी धुमाकूळ घालणार, 29 जिल्ह्यांना अलर्ट
मराठवाड्यामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याचं हवामान विभागाच्या अंदाजावरून स्पष्ट होतंय. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. पाहुयात 23 सप्टेंबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग वगळता मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पाचही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाचही जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यादरम्यान विजांचा कडकडाट आणि वादळी वारा वाहण्याची देखील शक्यता आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातीलही सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यात नांदेड वगळता उर्वरित सात जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भामध्ये ही पावसाचा जोर असणार आहे. बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
advertisement
7/7
दरम्यान राज्यामध्ये पुढील काही दिवस पावसाचे धुमशान कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तास मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असणार असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या जीविताची तसेच पिकांची व जनावरांची काळजी घेणे गरजेचे असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather alert: महाराष्ट्रात पाऊस आणखी धुमाकूळ घालणार, 29 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल