
पुणे : पुणे शहर हे ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक वारसा आणि खाद्यपरंपरेसाठी ओळखले जाते. शहरातील कॅम्प परिसरात गेली 112 वर्षे आपली खास चव आणि विश्वास टिकवून ठेवणारी रॉयल बेकरी आजही पुणेकरांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. 1914 साली या बेकरीची सुरुवात झाली. मात्र ज्या इमारतीत ही बेकरी आहे ती इमारत ब्रिटिश राजवटीत डिझाइन करण्यात आली होती. वसाहतकालीन उंच छत, बंद उंच खिडक्या आणि हवेशीर समोरील रचना आजही त्या काळाची साक्ष देतात.