वर्ल्डकपमध्ये बेंचवर बसवलं,आता वनडेतून हकालपट्टी, बाबर आझमच करिअर संपलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बाबर आझम वर्ल्डकपमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. त्याला सुरूवातीपासून संघात संधी देण्यात आली होती. पण या संधीच त्याला सोनं करता आलं नव्हतं.
advertisement
1/7

टी20 वर्ल्डकप 2026 च्या सूपर 8 मधून पाकिस्तान बाहेर झाली होती. पण या स्पर्धेत पाकिस्तानच्या पराभवापेक्षा बाबर आझमची प्रचंड चर्चा रंगली होती.
advertisement
2/7
कारण बाबर आझम वर्ल्डकपमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. त्याला सुरूवातीपासून संघात संधी देण्यात आली होती. पण या संधीच त्याला सोनं करता आलं नव्हतं.
advertisement
3/7
बाबर आझमने वर्ल्डकपमध्ये सुरूवातीचे सहा सामने खेळले होते. या सामन्यात त्याने 112 च्या स्ट्राईक रेटने 91 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याची ही कामगिरी पाहता त्याला सुपर 8 च्या सामन्यात बेंचवर बसवण्यात आलं होतं.
advertisement
4/7
दरम्यान पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर झाल्यानंतर आता बांग्लादेशसोबत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी पाकिस्तानच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
advertisement
5/7
<strong>बांग्लादेश विरूद्ध पाकिस्तानचा संघ :</strong> शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, फहीम अश्रफ, फैसल अकरम, हॅरीस रौफ, हुसैन तसत, माज सदाकत, मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), मोहम्मम वसीम, मोहम्मद गाझी घोरी (विकेटकिपर), साद मसूद, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, शामीयल हुसैन. दरम्यान पाकिस्तानच्या या संघात हा सहा खेळाडू हे अनकॅप आहेत.
advertisement
6/7
बांग्लादेशविरूद्ध वनडे सामन्याचे वेळापत्रक पहिला वनडे : पाकिस्तान वि बांग्लादेश, 11 मार्च 2026, शेरे बांगला नेशनल क्रिकेट स्टेडियन, ढाका दुसरा वनडे : पाकिस्तान वि बांग्लादेश, 13 मार्च 2026,शेरे बांगला नेशनल क्रिकेट स्टेडियन, ढाका तिसरा वनडे : पाकिस्तान वि बांग्लादेश, 15 मार्च 2026, शेरे बांगला नेशनल क्रिकेट स्टेडियन, ढाका
advertisement
7/7
दरम्यान वर्ल्डकपमध्ये बेंचवर बसवलं आणि आता वनेडच्या संघातून हकालपट्टी करण्यात आल्याने बाबर आझमच करिअर जवळ जवळ संपूष्ठात आल्याच बोललं जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
वर्ल्डकपमध्ये बेंचवर बसवलं,आता वनडेतून हकालपट्टी, बाबर आझमच करिअर संपलं