'माझा बाप वाघासारखा जगला अन्...', प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांच्या निधनाने पूर्ण खचला
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Karanvir Bohra father dies: टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेता करणवीर बोहरा याच्या कुटुंबावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. करणवीरचे वडील आणि प्रसिद्ध निर्माते महेंद्र बोहरा यांनी आज जगाचा निरोप घेतला.
advertisement
1/6

मुंबई : टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेता करणवीर बोहरा याच्या कुटुंबावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. करणवीरचे वडील आणि प्रसिद्ध निर्माते महेंद्र बोहरा यांनी आज जगाचा निरोप घेतला.
advertisement
2/6
वडिलांच्या जाण्याने करणवीर पूर्णपणे कोलमडून गेला असला, तरी त्यांच्या शेवटच्या प्रवासाबद्दल बोलताना त्याचा अभिमानही डोळ्यांतून ओसंडून वाहत आहे. सोशल मीडियावर एक अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट शेअर करत करणवीरने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
advertisement
3/6
वडिलांना श्रद्धांजली वाहताना करणवीरने त्यांच्या कणखर व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू उलगडले. करणवीर म्हणतो, "माझ्या बाबांची एक इच्छा होती की, जेव्हा ते हा जगाचा निरोप घेतील, तेव्हा ते कोणावरही ओझं नसतील. ते म्हणायचे, मला काम करता करता मरण आलं तर आवडेल. आणि अगदी तसंच घडलं. ते वाघासारखे जगले आणि आपल्या अटींवर, अत्यंत सन्मानाने या जगातून गेले. कोणताही त्रास न होता, शांतपणे त्यांचा शेवटचा प्रवास पार पडला."
advertisement
4/6
करणवीरने आपल्या पोस्टमध्ये वडिलांनी शिकवलेल्या जीवनमूल्यांचा उल्लेख केला आहे. तो लिहितो, "बाबा, तुम्ही मला आणि दीदीला आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा सोडू नका, पडलात तरी पुन्हा फिनिक्ससारखी झेप घ्या आणि नेहमी पॉझिटिव्ह रहा, ही तुमचीच शिकवण आहे. तुम्ही मला स्वप्न पाहायला शिकवलं. एखाद्या निर्मात्याचा अभिनेता कसा असावा आणि आपला शॉट पूर्ण केल्याशिवाय सेटवरून हलायचं नाही, ही शिस्त तुमच्याकडूनच आली."
advertisement
5/6
केवळ पेहरावातच नाही, तर लोकांसोबत वागतानाही स्टाईल आणि ग्रेस कशी असावी, याचा वस्तुपाठ महेंद्र बोहरा यांनी आपल्या मुलाला दिला होता. आज जो कोणी त्यांच्याबद्दल बोलतोय, तो एकच गोष्ट म्हणतोय, "माणूस खूप चांगला होता."
advertisement
6/6
आपल्या लाडक्या वडिलांना निरोप देताना करणवीरचे शब्द वाचून कोणाचेही डोळे पाणावतील. "बाबा, तुमची खूप आठवण येईल. आई-वडिलांना गमावल्याचं दु:ख काय असतं, हे ज्याने अनुभवलंय त्यालाच कळतं. पण तुमचा मुलगा म्हणून जन्माला आलो, याचा मला अभिमान आहे. बाबा... मेरी जान, मेरा दिल तुझपे कुर्बान! आता तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासाला निश्चिंतपणे निघा, कारण तुमचं इथल्या सगळ्या जबाबदाऱ्या मी समर्थपणे सांभाळेन," असा शब्दही त्याने आपल्या वडिलांना दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माझा बाप वाघासारखा जगला अन्...', प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांच्या निधनाने पूर्ण खचला