व्हायचं होतं पत्रकार, झाली अभिनेत्री; अभिनयातून मिळाली करियरला कलाटणी, कोण आहे 'ही' हिरोईन
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
अनेक बॉलिवूड आणि टॉलिवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या श्रद्धा दासने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. श्रद्धाने पत्रकारिता सोडून अभिनयामध्ये येण्याचा निर्णय घेतला. 2008 साली ड्रामा स्कुलमध्ये अभिनयाचे धडे घेता घेता तिने अभिनय करण्याचा निर्णय घेतला. 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर श्रद्धाला टॉलिवूडमध्ये 'सीक्वेल क्वीन' म्हणून ओळखले जाते. श्रद्धाने आपल्या स्वत:च्या कतृत्त्वावर, सौंदर्यावर आणि तिच्या बेस्ट डान्स स्कीलवर टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये एक लोकप्रिय चेहरा बनली आहे.
advertisement
1/7

अभिनेत्री श्रद्धा दासची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षाही काही कमी नाही. पत्रकारितेचे शिक्षण घेण्यापासून ते रुपेरी पडद्यापर्यंतचा तिचा प्रवास खरोखरच उल्लेखनीय आहे. श्रद्धा दासचा जन्म मुंबईतील एका बंगाली कुटुंबात झाला. तिने मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी मिळवली. तिचे पत्रकारिता क्षेत्रात करियर करण्याचा विचार होता. पण, नशिबाने तिला अभिनय जगातात ओढले.
advertisement
2/7
श्रद्धाने अभिनयाला गांभीर्याने घेतले. तिने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये पियुष मिश्रा आणि चित्तरंजन गिरी सारख्या दिग्गज कलाकारांसोबत थिएटर वर्कशॉपमध्ये भाग घेतला. या ट्रेनिंगमुळे तिला एक अनुभवी कलाकार बनण्यास मदत झाली.
advertisement
3/7
श्रद्धाने 2008 मध्ये "सिद्धू फ्रॉम सिकाकुलम" या तेलुगु चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू केले. तिच्या पहिल्याच चित्रपटातील अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि पहिल्याच चित्रपटातून रातोरात टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री झाली.
advertisement
4/7
श्रद्धाला टॉलिवूड इंडस्ट्रीत "सिक्वल क्वीन" म्हणून ओळखले जाते, हे फार कमी लोकांना माहिती आहे. कारण तिने 'आर्य 2' आणि 'नागावल्ली' सारख्या अनेक हिट चित्रपटांच्या सिक्वेलमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत, ज्यांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
advertisement
5/7
2010 साली, श्रद्धाने "लाहोर" चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये तिने "इदा" ही भूमिका साकारली. जरी ती मुंबईची असली तरी तिला बॉलिवूडमध्ये स्वतःला स्थापित करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.
advertisement
6/7
श्रद्धा फक्त बॉलिवूड आणि टॉलिवूड पर्यंतच मर्यादित नाही राहिली. तिने तमिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली यासह पाच हून अधिक भाषांमधील 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने अनेक बॉलिवूडमधल्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
advertisement
7/7
श्रद्धा ही केवळ एक उत्तम अभिनेत्री नसून एक फेमस डान्सर सुद्धा आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, तिने वेब सीरीज आणि टीव्ही शोमध्येही तिची प्रतिभा दाखवली आहे, ज्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवर तिची लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
व्हायचं होतं पत्रकार, झाली अभिनेत्री; अभिनयातून मिळाली करियरला कलाटणी, कोण आहे 'ही' हिरोईन