
कोल्हापुरात एक प्रचारात एक वेगळा रंग पाहायला मिळाला. आम आदमी पार्टीचे शाहिर दिलीप सावंत आपल्या लेकीसोबत निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यांनी आपली मुलगी दिप्ती जाधव यांच्यासोबत डफ तुंतुण वाजवत प्रचार केला आहे.त्यांनी या शाहिरी मधून समस्या आणि सामाजिक प्रश्न मांडले आहेत. आम आदमी पार्टीमधून दिप्ती जाधव उभ्या राहिल्या आहेत.
Last Updated: Jan 08, 2026, 15:30 ISTमराठीसाठी मनसे पुन्हा आक्रमक होताना दिसते आहे. मुंबई- नाशिक मार्गावर एका धाब्याचे नाव बॉम्बे असे ठेवण्यात आले होते. तो बॅनर मनसे कार्यकर्त्यांनी फाडला आहे. त्यांनी हा बॅनर बदलून मुंबई असे करण्याचा दम कार्यकर्त्यांनी दिला आहे. \r\n
Last Updated: Jan 09, 2026, 21:39 ISTआतले विरुद्ध बाहेरचे असा वाद ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री यांच्यात पेटलेला दिसत आहे. तेव्हा राज ठाकरें म्हणाले, बाहेरच्या राज्यकर्त्यांना मुंबईचे प्रश्न कधीच समजू शकणार नाहीत.यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
Last Updated: Jan 09, 2026, 21:24 ISTनाशिकमधून उद्धव ठाकरेंचं भाषण झाले. त्यात ते म्हणाले, "मुंबईमध्ये जिजामाता उद्यानात १० वर्षापूर्वी पेंग्विन आणले.आमच्यावर टीका केली. पेंग्विन आणले. हो पेंग्विन आम्ही आणले.ते पेंग्विन बघायला लोकं तिकीट काढून गर्दी करतायत.त्यांच्या सभेला पैसे देऊन माणसं आणावी लागतात. म्हणजे पेंग्विन एवढीही किंमत त्यांची नाहीये. पैसे घेऊनही त्यांच्या सभेला येत नाहीयेत. ही अवस्था आहे त्यांची."
Last Updated: Jan 09, 2026, 21:06 ISTनाशिकमधून उद्धव ठाकरेंचं भाषण चालू आहे. त्यात ते म्हणाले," भाजपने अकोटमध्ये एमआयएम सोबत युती केली.तेव्हा काय सुटलं नव्हतं तुमचं की मुळात सुटायला काही नव्हतंच." असा घणाघात विरोधकांवर केला आहे.
Last Updated: Jan 09, 2026, 20:42 ISTनाशिकमधून राज ठाकरेंचं भाषण चालू आहे. त्यात त्यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे. त्यात ते म्हणाले, "कल्याण डोंबिवलीतील उमेदवारांना १५ कोटींची ऑफर दिली गेली होती."
Last Updated: Jan 09, 2026, 20:19 IST