Bigg Boss Marathi 6 : हाजी हाजी करायला आलोय का आम्ही इथं! टोळीतील सगळ्यात स्ट्राँग सदस्य 'आऊट'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या घरात आता मोठा ट्विस्ट येताना दिसतो आहे. टोळीतील एक सदस्य बाहेर पडला आहे. त्यामुळे घरातील वातावरण आता पूर्णपणे बदलणार आहे.
advertisement
1/5

वीकेंड जसजसा जवळ येतो, तसतसं बिग बॉस मराठी 6 च्या घरातून कोण बाहेर पडणार याची धाकधूक बिग बॉस प्रेमींना लागून राहिलेली असते. नॉमिनेशन आणि वोटिंगनुसार बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर हे आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच समजेल. पण त्याआधीच टोळीतून मात्र एक स्ट्राँग सदस्य बाहेर पडला आहे.
advertisement
2/5
बिग बॉस मराठी 6 च्या घरातील टोळीत फूट पडली आहे. नव्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये टोळीतच वाद झाल्याचं पाहायला मिळतं आहे. फूट पडत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
advertisement
3/5
प्रोमोत तुम्ही पाहू शकता अनुश्री टोळीतील सदस्यांना बोलते, "तुम्ही इथं बोलत होता, मला अनुश्री टोळीत नको आहे. रोज सगळ्यांची काळजी घ्या, सगळे एफर्ट्स घेऊन करते मी स्वत:, कुणी माझ्यासाठी काही करत नाही." यावेळी तिच्या अश्रूंचा बांधही फुटतो, ती रडू लागते.
advertisement
4/5
पुढे अनुश्री मी टोळी सोडतेय, असं आपला निर्णय जाहीर करते. यावर विशाल भडकून तिला 'तुला नाही ठेवत गं' असं म्हणतो. शेवटी अनुश्री याची हाजीहाजी करायला आलोय का आम्ही इथं, असं म्हणताना ऐकू येते.
advertisement
5/5
अनुश्रीचा हा निर्णय तिचे चाहते आणि प्रेक्षकांनाही आवडला आहे. अनुश्रीला लवकर कळलं, तिने चांगला निर्णय घेतला. त्या रोशनलापण सांगा, अशा कमेंट यावर येत आहेत. आता अनुश्रीच्या या निर्णयाने घरातील वातावरण कसं होणार, याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : हाजी हाजी करायला आलोय का आम्ही इथं! टोळीतील सगळ्यात स्ट्राँग सदस्य 'आऊट'